ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘कॅप्टन कूल’ ला मानधनाच्या 50 टक्के दंड

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 12:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘कॅप्टन कूल’ ला मानधनाच्या 50 टक्के दंड

शहर : jaipur

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात ’कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं विजय मिळवला. पण मैदानात नेहमीच शांत असलेल्या धोनीचा कधी नव्हे तो या लढतीदरम्यान संयम सुटला आणि त्यानं मैदानात घुसून थेट पंचांशीच हुज्जत घातली. त्यामुळं त्याला मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.  सामना कोणताही असला तरी निर्विकारपणे आणि थंडपणे रणनिती आखत ती पूर्ण करणार्‍या धोनीचं रौद्ररुप चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान पाहायला मिळालं. चेन्नईचा संघ आव्हानाचा पाठलाग करत असताना अखेरच्या षटकात हा सगळा तमाशा पाहायला मिळाल. पॅव्हेलिअनमधून सामना बघत असलेला धोनी पंचांच्या एका निर्णयामुळे भडकला आणि त्याने थेट मैदानात घुसून पंचांशी हुज्जत घातली. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा चेन्नईच्या संघाला 2 चेंडूत 6 धावा हव्या होत्या. कमरेच्यावर  चेंडू असूनही तो पंचांनी नो बॉल दिला नाही. यामुळे आधी फलंदाज रवींद्र जाडेजाने आक्षेप नोंदवत भांडायला सुरुवात केली. त्याच्या मदतीला धोनी धावून आला आणि त्यानेही पंचांशी हुज्जत घातली.

मागे

राजस्थान रॉयल्सला दोन धक्के, रहाणेपाठोपाठ बटलरही बाद
राजस्थान रॉयल्सला दोन धक्के, रहाणेपाठोपाठ बटलरही बाद

सुसाट फॉर्ममध्ये चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर रोखण्याचे आव्हान र....

अधिक वाचा

पुढे  

टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज, भारतीय संघाची  घोषणा
टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज, भारतीय संघाची घोषणा

आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा केली. के. एल. राहु....

Read more