ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

55 वर्षानंतर भारतीय टेनिस खेळाडू करणार पाकिस्तानचा दौरा

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 05:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

55 वर्षानंतर भारतीय टेनिस खेळाडू करणार पाकिस्तानचा दौरा

शहर : delhi

सध्या भारत पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय संबंध ताणलेले आहेत. कश्मीर मुद्द्यावरून पाक बिथरलेला आहे. भारत पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना असेल तर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. परंतु पाक मधील दहशतवादी धार्जिणे धोरण यामुळेच या देशात भारतीय क्रिकेट संघाने दौरा केलेला नाही. तर दहशतवादी हल्ल्याच्या भीतीनेच श्रीलंकेच्या प्रमुख 10 खेळाडूंनी पाक मध्ये दौर्‍यावर जाण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय टेनिस संघ तब्बल 55 वर्षानी पाक दौर्‍यावर जाण्याची शक्यता आहे.

भारतीय टेनिस संघ येत्या 29 व 30 नोव्हेबर किंवा 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरला पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये जावून डेविड कप टेनिस स्पर्धा खेळणार आहे. तत्पूर्वी 4 नोव्हेंबरला एकदा पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करून मगच निर्णय घेतला जाईल, असेही भारतीय टेनिस संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र तेथील सुरक्षा व्यवस्था समाधानकारक नसेल तर या सामन्यांचे आयोजन अन्य ठिकाणी करण्यात येणार आहे.

 

 

मागे

महिला हॉकी संघाचे नेतृत्व राणीकडे
महिला हॉकी संघाचे नेतृत्व राणीकडे

येत्या 27 सप्टेंबर पासून भारत ग्रेट ब्रिटन यांच्यात महिलाच्या पाच हॉकी सामन....

अधिक वाचा

पुढे  

दिनेश मोंगियाचा क्रिकेटला रामराम
दिनेश मोंगियाचा क्रिकेटला रामराम

भारताचा क्रिकेटपट्टू दिनेश मोंगियाने वयाच्या 42 वर्षी क्रिकेटच्या सर्व प्र....

Read more