By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2021 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हनुमा विहारी (Hanuma vihari) आणि आर. अश्विन (R Ashwin) यांच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाने सिडनी कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. त्यानंतर भारतीय संघ आणि अश्विन-विहारी या जोडीवर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ड्रेसिंग रूममध्ये परतलेल्या आर. अश्विनला कर्णधार अजिंक्य रहाणे कडकडून मिठी मारताना दिसत आहे.
सिडनी कसोटीत प्रमुख फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. त्यावेळी अश्विन आणि हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा सामना करत शेवटपर्यंत खिंड लढवली. या दोघांना बाद करण्यासाठी कांगारुंनी अनेक प्रयत्न केले. मात्र ही जोडी शेवटपर्यंत फुटली नाही. अश्विन आणि विहारीने कांगारुंना चांगलंच रडवलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी पाचव्या दिवसखेर 259 चेंडूत 62 धावांची झुंजार भागीदारी केली. अश्विनने 128 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 161 चेंडूमध्ये 4 चौकारांसह नाबाद 23 धावा केल्या.
‘आज पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटतंय’
सिडनी कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवल्यानंतर आर. अश्विनची प्रतिक्रया लक्ष वेधून घेणारी होती. हा सामना ड्रॉ करुन पाकिस्तानचा पराभव केल्यासारखं वाटतंय, असे अश्विनने म्हटले.
‘माझ्यासाठी आजचा दिवस सर्वांत वाईट…’, मॅच ड्रॉ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यातील तिसरा सामना अनिर्णित राहिला. ही मॅच ड्रॉ करायला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा (Tim Paine) देखील महत्त्वाचा वाटा आहे. तो असा की, त्याने भारताच्या महत्त्वाच्या फलंदाजांचे स्टम्पमागे कॅच सोडले. त्याच्या याच निराशाजनक खेळीचं त्याचं त्यालाच वाईट वाटतंय. सामना संपल्यानंतर माझ्यासाठी आजचा दिवस सर्वांत वाईट होता, अशी प्रतिक्रिया टीम पेन याने दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा तिसरा सामन....
अधिक वाचा