ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टीम इंडियाचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी कालवश

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टीम इंडियाचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी कालवश

शहर : मुंबई

       मुंबई - टीम इंडियाचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. बापू नाडकर्णी हे ८७ वर्षांचे होते. बापू नाडकर्णी त्यांच्या मुलीकडे मुंबईत हिरानंदानी गार्डन येथे राहत होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उजव्या हाताचे गोलंदाज बापू नाडकर्णी यांनी इंग्लंड टीमविरोधात सर्वाधिक २१ ओव्हर एकही रन न काढू देता टाकल्या होत्या. तो रेकॉर्ड आजही अतूट आहे. 


        बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी आपल्या परिवारासह मुंबईत राहत होते. बापूंचा जन्म ४ एप्रिल १९३३ रोजी झाला. ते १३ वर्षांचे असल्यापासून टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळत होते. बापू नाडकर्णी यांनी १६ डिसेंबर १९५५ रोजी न्यूझीलंडविरोधात खेळताना दिल्लीत टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ते १९६८ पर्यंत टीम इंडियाकडून खेळत राहिले. 


      ४१ कसोटी सामन्यात त्यांनी ६५ डावात ८८ विकेट घेतल्या. हैराण करणारी बाब म्हणजे त्यांच्या करिअरचा इकॉनमी रेट १.७ रन प्रति ओव्हर होता. बापू नाडकर्णी यांनी १४१४ धावा काढल्या, ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.
 

मागे

रविवारपासून आयसीसीची १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धा सुरू
रविवारपासून आयसीसीची १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धा सुरू

      केपटाऊन - भारताच्या १९ वर्षाखालील संघाने आयसीसी स्पर्धेचे २०००, २....

अधिक वाचा

पुढे  

सुपरमॉम सानिया मिर्झाचे पुनरागमन; दुहेरीचे अजिंक्यपद
सुपरमॉम सानिया मिर्झाचे पुनरागमन; दुहेरीचे अजिंक्यपद

       मुंबई - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आई झाल्यानंत....

Read more