ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

क्रिकेटमध्येही होणार मिश्र टी-२० मॅच

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 04:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

क्रिकेटमध्येही होणार मिश्र टी-२० मॅच

शहर : मुंबई

टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये आपण मिश्र दुहेरी सामने नेहमीच बघतो. पण फूटबॉल आणि क्रिकेटमध्ये अशाप्रकारे महिला आणि पुरुष एकाच टीममधून खेळताना कधी पाहिलं गेलं नाही. पण आता पुरुष आणि महिला टीमचा एक टी-२० सामना होण्याची शक्यता आहे. भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने असे संकेत दिले आहेत. भारतीय महिला टीम मागच्या बऱ्याच कालावधीपासून चांगली कामगिरी करत आहे. पण महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंएवढं मानधन मिळत नाही. मिताली राजसह अनेक महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्यासाठीही आयपीएल सुरु करण्यात यावं, अशी मागणी वारंवार केली आहे. बीसीसीआयने मात्र अजूनही याबद्दल निर्णय घेतलेला नाही. महिलांसाठी आयपीएलसारखी स्पर्धा सुरु होत नसली तरी महिला आणि पुरुष क्रिकेटपटू एकत्र खेळताना दिसू शकतात. हरमनप्रीत कौरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अशाप्रकारचं आव्हान स्वीकारत असल्याचं हरमनप्रीत म्हणाली आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि मिताली राजदेखील हे आव्हान स्वीकारताना दिसत आहेत. हरमनप्रीत ट्विटरवर म्हणाली, 'आता वेळ आली आहे खेळाबद्दलचा चुकीचा समज संपवला पाहिजे. याच कारणासाठी @rcgameforlife सोबत हात मिळवत आहे. #ChallengeAccepted. मिश्र टी-२० मॅचसाठी तुमचंही समर्थन द्या.'

मागे

आयपीएल 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई मध्ये रंगणार लढत
आयपीएल 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई मध्ये रंगणार लढत

गतविजेती चेन्नई विरुद्ध मुंबई टीममध्ये बुधवारी (3 एप्रिल) मॅच खेळली जाणार आह....

अधिक वाचा

पुढे  

IPL : विजयाचे शतकं लगावणारी मुंबई पहिलीच टीम
IPL : विजयाचे शतकं लगावणारी मुंबई पहिलीच टीम

चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात बुधवारी झालेल्या  मॅचमध्ये  मुंबईने 37 रनन....

Read more