By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील खेळाडू अंबाती रायडू याने अखेर क्रिकेटला राम राम केल्याची घोषणा आज केली. तसे पत्र बीसीसीआयला त्याने पाठविले. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत संधी न मिळाल्याने अखेर त्याने निवृती घेत असल्याचे समजते.
काही दिवसापूर्वी त्याने टी 20 व एकदिवसीय सामन्यामधे अधिक लक्ष देण्यासाठी प्रथमश्रेणी क्रिकेट मधून निवृत घेतली होती. मात्र एकदिवसीय सामन्यांमद्धे संधि मिळत नसल्याने आणि विश्वचषक स्पर्धेतही शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यावरही त्याच्या नावाचा विचार केला गेला नसल्यामुळे नाराजीतून हा निर्णय घेतल्याचे समजते. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येते.
रायडू ने आतापर्यंतच्या करियर मध्ये एकदिवसीय सामन्यात 55 सामने खेळले असून 47.05च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचरोबर 6 टी 20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत.यावर्षी आयपीएल मध्ये तो चेन्नई सुपर किंग तर्फे खेळला होता. आयपीएलच्या 147 सामन्यात 3300 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतीय संघानेही वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प....
अधिक वाचा