By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 05:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात १८ एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये मुंबईने दिल्लीचा ४० रनने पराभव केला. या मॅच दरम्यान अनेक रेकॉर्ड बनले. यापैकी एक रेकॉर्ड दिल्लीच्या अमित मिश्राने केला आहे. मिश्राने आयपीएलमध्ये १५० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय बॉलर ठरला आहे.मुंबई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मिश्राने रोहित शर्माची विकेट घेत १५० विकेट घेण्याची किमया केली. विशेष म्हणजे मिश्राने रोहितला आऊट करण्याची ही सहावी वेळ होती. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड देखील अमित मिश्राच्या नावे आहे. मिश्राने तीन वेळा हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याबाबतीत अमित मिश्रा १५० विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा आणि आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान बॉलर लसिथ मलिंगा पहिल्या क्रमांकावर आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये ११५ मॅचमध्ये १६२ विकेट घेण्याची कामगिरी बजावली आहे. या यादीत कोलकाताचा फिरकीपटू पियूष चावला तिसऱ्या क्रमांकावर आहे. चावलाने आयपीएलमध्ये १५२ मॅचमध्ये १४६ विकेट घेतले आहे.
IPL मधील ५ यशस्वी बॉलर्स |
||
बॉलर्स |
विकेट |
|
लसिथ मलिंगा |
162 |
|
अमित मिश्रा |
150 |
|
पीयूष चावला |
146 |
|
ड्वेन ब्रावो |
143 |
|
हरभजन सिंह |
141 |
रोहित शर्माने देखील या मॅचमध्येच आपल्या टी-२० कारकिर्दीतील ८ हजार रन पूर्ण केले आहे. दिल्ली विरुद्ध खेळण्याआधी रोहितला केवळ १२ रनची गरज होती. रोहितने क्रिस मॉरिसच्या बॉलवर फोर मारुन आपले ८ हजार रन पूर्ण केले. रोहितच्या ८ हजार रन पैकी ४ हजार ७१६ रन या आयपीएलमध्ये केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि सुरेश रैना हे दोघे रोहित शर्मापेक्षा अग्रस्थानी आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील डेन वॅन निकेर्क आणि मॅरीजाने कॅप या दोघ....
अधिक वाचा