By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अवघ्या चार दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे. प्रत्येक लहान मुलांना या सणाचे आकर्षण असलेल्या सांताक्लॉजबाबत उत्कंठा असते. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार सांताक्लॉजच्या वेशात कोलकात्यामधील अनाथ आश्रमात पोहोचला आणि अनाथ मुलांना त्याने भेटवस्तू व खाऊचे वाटप केले. सांताक्लॉजच्या रुपात विराटला पाहून मुलांच्या चेहर्यावर हास्य दिसून आले.
नाताळच्या दिवशी आपल्याला भेटवस्तू आणि आवडीचा खाऊ देणाऱ्या सांताक्लॉजची लहान मुले वाट पाहत असतात. हा आनंद अनाथ मुलांनाही अनुभवता यावा, यासाठी सांताक्लॉजच्या रुपात विराट अनाथ आश्रमात पोहोचला. विराट कोहलीचा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने शेअर केला आहे. विराट या व्हिडिओत सांताक्लॉजच्या वेशात लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. विराटला एका मुलाने तुझी दाढी मला खूप आवडते असे सांगितले. हे ऐकून विराटलाही हसू आवरले नाही.
आंध्र प्रदेशातल्या राजमुंदरीमध्ये जन्मलेल्या गंडीकाेटा सर्व लक्ष्मी म्ह....
अधिक वाचा