ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रीय उतेजक चाचणी प्रयोगशाळेवर बंदी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रीय उतेजक चाचणी प्रयोगशाळेवर बंदी

शहर : delhi

राष्ट्रीय उतेजक चाचणी प्रयोगशाळेवर जागतिक उतेजक प्रतिबंधक संस्थेने(वाडा) 6 महिन्यांची बंदी घातल्याने भारतामधील उतेजक विरोधी चळवळीला धक्का बसला आहे. त्यामुळे राष्ट्रीय उतेजक प्रतिबधक संस्था (नाडा) रक्त किंवा लघवीचे नमुने घेऊ शकते, परंतु त्यांच्या चाचणीसाठी वाडाची मान्यता असलेल्या देशाबाहेरील प्रयोग शाळांवर अवलंबून राहावे लागणार आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी 11 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना 20 ऑगस्टपासून चाचणी घेण्याचा अधिकार काढून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भारतामधील राष्ट्रीय उतेजक चाचणी प्रयोगशाळेला 2008 मध्ये 'वाडा'ची मान्यता मिळाली होती. तथापि, आंतरराष्ट्रीय प्रयोग शाळांच्या निकषांची पूर्तता राष्ट्रीय उतेजक चाचणी प्रयोगशाळेकडून होत नव्हती. शिवाय नमून्यांच्या पृथकरण   पद्धतीसुद्धा योग्य पद्धतीने होत नव्हत्या . त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असे 'वाडा' ने स्पष्ट केले आहे. मात्र वाडाच्या या निर्णयाविरोधात आम्ही क्रीडा लवादाकडे दाद मागणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे.

पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर 'नाडा' 5 हजार खेळाडूंच्या चाचण्या घेण्याची शक्यता होती. 2018-19 या वर्षात 'नाडा' कडून 4 हजार 348 चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 466 चाचण्या रक्ताच्या होत्या. राष्ट्रीय क्रीडा महासंघ किंवा क्रीडा मंत्रालयाने हा अतिरिक्त भार स्वीकारला नाही तर चाचण्यांची संख्या कमी होईल.

मागे

आणि भारताने नोंदविला कसोटीतला पहिला विजय
आणि भारताने नोंदविला कसोटीतला पहिला विजय

24 ऑगस्ट 1971 रोजी भारतीय क्रिकेट संघाने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय संघाने विंडीजचा केला 318 धावांनी पराभव
भारतीय संघाने विंडीजचा केला 318 धावांनी पराभव

आंटिगा येथील कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा चौथ्याच द....

Read more