By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
देशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी आशियाई पदक विजेता प्राजक्ता अंकोलेकर महिला व मुलींना मोफत स्वसंरक्षणाचे धडे देत आहे. आपण शिकलेली कला इतर मुलींना कामी आली पाहिजे. अचानक घडलेल्या प्रसंगाला तोड देण्याचे धाडस मुलींमध्ये यावे यासाठी प्राजक्ताने हा उपक्रम हाती घेतला.
मूळ रत्नागिरीच्या असलेल्या या खेळाडूने नुकत्याच काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा (सॅफ) स्पर्धेत भारताला रौप्यपदक जिंकून दिले आहे. तिची या स्पर्धेतील कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे तिने भारतीय संघाला पदक मिळवून दिले.
प्राजक्ता ही कर्नाळा स्पोर्ट््स अकादमीची खेळाडू अाहे. तिला सध्या प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आता प्राजक्ता पुढील प्रशिक्षणासाठी तीन महिन्यांसाठी दक्षिण कोरिया येथे जाईल. आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी ती कठोर मेहनत घेतेय. तिच्या यशात प्रशिक्षक पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. यासाठी ती प्रचंड मेहनतीच्या बळावर हा यशाचा पल्ला गाठेल, असा विश्वास प्रशिक्षकांना अाहे. तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा निश्चित माेठा फायदा हाेईल, असेही तिने सांगितले.
कोलकाता - इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या 12 व्या सीझनसाठी येत्या 19 डिसेंबर रोजी ख....
अधिक वाचा