By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 19, 2021 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटीतील (Aus vs Ind 4th Test) पाचव्या दिवसाचा खेळ रंगतदार स्थितीत पोहचला आहे. टीम इंडियाला विजयाची जास्त संधी आहे. टीम इंडियाने चहापानापर्यंत 3 विकेट्स गमावून एकूण 183 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी145 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान टी ब्रेकच्या आधी टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) फलंदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका बसला. हातावर बसलेला चेंडूचा फटका फार जोरदार होता. त्यामुळे पुजारा हातातील बॅट फेकून मैदानातच आडवा पडला. हा सर्व प्रकार पाहून टीम इंडियाचे फिजीओ धावत मैदानात आले.
नक्की काय झालं?
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सामन्यातील 49 वी ओव्हर टाकायला आला. पुजारा 26 धावांवर खेळत होता. हेझलवूडने या ओव्हरमधील दुसरा चेंडू टाकला. हा टाकलेला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकला. पुजाराने हा चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजाराचा अंदाज चुकला. त्यामुळे तो चेंडू बॅटवर न येता पुजाराच्या ग्लोव्हजवर लागला. हा फटका इतका जोरदार होता की पुजाराने हातातील बॅट फेकून दिली. मैदानातच आडवा पडला. यानंतर नॉन स्ट्राईकवर असलेला कर्णधार अजिंक्य रहाणे पुजाराच्या दिशेने धावून गेला. तसेच फिजीयोही मैदानात आले. या फटक्यामुळे पुजाराला मैदानाबाहेर जावे लागतं की काय, अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र पुजाराने जोमाने खेळायला सुरुवात केली.
Ouch! Pujara rips his glove off after copping one flush on the glove!
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2021
Live #AUSvIND: https://t.co/qvYTMSiZsl pic.twitter.com/xXLuC0jcEa
हेझलवुडच्या बाउन्सरवर हेल्मेट फुटला
हाताला बसलेल्या फटक्यानंतर पुजाराने जोमाने खेळायला सुरुवात केली. मात्र पुन्हा 51 व्या ओव्हरमध्ये आणखी एक प्रकार घडला. यावेळेसही हेझलवूड गोलंदाजी करत होता. हेझलवूडने शॉर्ट पिच बोल टाकला. हा बोल पुजाराच्या हेल्मेटवर येऊन धडकला. हा शॉर्ट पीच चेंडू इतक्या वेगाने आला की पुजाराचा हेल्मेट फुटला. हेल्मेटचा तुकडा पडला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 4th Test) यांच्यात शुक्रवार 15 जानेवारीपासून ....
अधिक वाचा