By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2020 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या विक्रमांची चर्चा मोठ्या प्रमाणात केली जाते. पण काही वेळा मैदानावर असं काही घडतं की ती दुर्दैवी घटना म्हणून कायम स्मरणात राहते. क्रिकेटच्या इतिहासात अशीच एक दुर्दैवी घटना 27 नोव्हेंबर 2014 साली घडली होती. आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक क्रिकेट सामन्यात एका बाउंसरवर जखमी झाल्याने 25 वर्षीय युवा फलंदाज फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला होता.
जन्मदिवसाच्या तीन दिवस आधी मृत्यूचा घाला
गोलंदाज सीन एबॉटच्या एक बाउंसरने 24 नोव्हेंबर 2014 रोजी फिलिप ह्यूज वेध घेतला. त्यावेळी फिलिप ह्यूजने हेल्मेट घातले असले तरी तो बाउंसर त्याच्या मानेच्या भागावर आदळला आणि तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला मैदानावरुन स्ट्रेचरच्या माध्यमातून बाहेर नेण्यात आले. त्यानंतर सिडनीच्या एका हॉस्पिटलमध्ये फिलिप ह्यूज तीन दिवस मृत्यूशी झुंज देत होता. अखेर 27 नोव्हेंबर रोजी झुंज अपयशी ठरली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे तीनच दिवसानंतर, म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी त्याचा जन्मदिवस होता. त्या आधीच फिलिप ह्यूजने जगाचा निरोप घेतला.
ऑस्ट्रेलियामध्ये 30 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेल्या फिलिपने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये 26 कसोटी, 25 वनडे इंटरनॅशनल आणि एक टी-20 इंटरनॅशनल सामने खेळले होते. त्याने 9 जानेवरी 2006 साली न्यू साउथ वेल्स संघाच्या माध्यमातून अंडर-17 क्रिकेट सामने खेळायला सुरु केले होते. त्याचा अखेरचा सामना तो खेळत असताना त्याने 63 धावा केल्या होत्या.
भारताच्या रमन लांबाचा मृत्यूही अशाच प्रकारचा
या आधी अनेक देशांच्या खेळाडूंनी अशा प्रकारे आपला जीव गमावला आहे. यात भारताचा फलंदाज रमन लांबाचा समावेश होतो. चार कसोटी सामने आणि 32 एकदिवसीय सामने खेळलेल्या रमन लांबाचा 1988 साली ढाकातील एका क्लब मॅच दरम्यान क्षेत्ररक्षण करताना चेंडू डोक्याला लागल्याने मृत्यू झाला होता.
आयपीएल -13 मध्ये 28 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्....
अधिक वाचा