By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2020 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND, 2nd Test) यांच्यात मेलबर्नमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात शानदार 326 धावा करत 131 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली. ही आघाडी मिळवण्यात कर्णधार अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) महत्वाचं योगदान राहिलं. अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार शतक ठोकत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या शतकी खेळीनंतर ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूने रहाणेचे कोतुक केलं.
या शतकी खेळीनंतर स्टीव्ह स्मिथने रहाणेचं अभिनंदन केलं. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी सामन्यात स्लेजिंग केली जाते. मात्र स्टीव्हने रहाणेचं अभिनंदन करत खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले.
अजिंक्य मेलबर्नवर दुसऱ्यांदा शतक लगावणारा दुसराच भारतीय ठरला आहे. याआधी विनू मांकड यांनी ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे ही दोन्ही शतकं अजिंक्यने बॉक्सिंग डे कसोटीत लगावली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अजिंक्यने 2014 मध्ये मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरोधात शतकी खेळी केली होती.
तसेच रहाणेने हनुमा विहारी आणि रिषभ पंतसह चांगली भागीदारी केली. तर यानंतर रवींद्र जाडेजासह 121 धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदाऱ्यांमध्ये रहाणेने महत्वाची भूमिका बजावली. तसेच कर्णधारपदाच्या भूमिकेला न्याय दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. त्यानंतर रहाणे दुर्देवीरित्या आऊट झाला. रहाणेने 223 चेंडूत 12 चौकारासंह 112 धावांची शतकी खेळी केली.
“कर्णधाराला पाहून शिकतोय”
शुभमन गिलने आयपीएलमध्ये चमकदार कामिगिरी केली. या जोरावर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं. तसेच त्याला दुसऱ्या कसोटीत पदार्पणही केलं. या पदार्पणातील सामन्यातील पहिल्या डावात गिलने 65 चेंडूत 8 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. “कांगारुंच्या आक्रमक आणि भेदक माऱ्याला कसे उत्तर द्यावे, हे मी कर्णधार रहाणेकडून शिकतोय”, असं गिल म्हणाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये गिलने हे वक्तव्य केलं.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यात बॉर्डर-गावसकर कसोटी मा....
अधिक वाचा