By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 07:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरसच्या देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे कडून स्पष्ट करण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार IPL स्पर्धा २९ मार्चपासून सुरु होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या स्पर्धेच्या आयोजनावर टांगती तलवार होती. अखेर ही शक्यता खरी ठरली असून आता IPL १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर पडली आहे. आयपीएलच्या सर्व संघमालकांना याबाबत कल्पना देण्यात आल्याची माहितीही BCCIकडून देण्यात आली.
मागे
कोरोनामुळे भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरिज रद्द
देशभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिके....
अधिक वाचा