By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 07, 2021 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (BCCI President Sourav Ganguly) वुडलॅंड्स रुग्णालयातून (Woodlands Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुलीला सहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. एनएआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. मी पूर्णपणे ठणठणीत आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. तसेच माझ्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केलीत, मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया सौरव गांगुलीने डिस्चार्जनंतर दिली.
गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला वर्कआऊट करताना डोळ्यांसमोर अंधारी आली. यानंतर त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गांगुलीला बुधवारी 6 जानेवारीलाच डिस्चार्ज देण्यात येणार होता. “मला आणखी एक दिवस रुग्णालयात थांबायचं आहे”, अशी इच्छा गांगुलीने व्यक्त केला. यामुळे रुग्णालयातील मुक्काम एका दिवसाने वाढला.
West Bengal: BCCI President Sourav Ganguly discharged from Woodlands Hospital in Kolkata.
— ANI (@ANI) January 7, 2021
He says, "I thank the doctors at the hospital for the treatment. I am absolutely fine." pic.twitter.com/snnV96LjL9
गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेतून गांगुलीला एकूण 3 ब्लॉकेज असल्याचं निदान झालं. या शस्रक्रियेतून एक मोठा ब्लॉकेज काढण्यात आला. “हा काढण्यात आलेला ब्लॉकेज मोठा होता. यामुळे गांगुलीच्या हृदयाला सुरळित रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत होता”, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
गांगुलीसाठी देशभरातून प्रार्थना
गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीच्या उत्तम प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात आली. अनेक क्रिकेटपटूंनी गांगुलीसाठी प्रार्थना केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीच्या पत्नीशी फोनद्वारे संपर्क साधून चौकशी केली. तसेच मदतीचे आश्वासनही दिले होते.
गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा
गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. या आजारामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. योग्य आणि सुरळीतपणे रक्तपुरवठा न झाल्याने गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) क्वारंटाई....
अधिक वाचा