ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बंगळुरू बुल्स कडून यु मुंबा पराभूत

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बंगळुरू बुल्स कडून यु मुंबा पराभूत

शहर : मुंबई

वरळीच्या एनएससीआय येथे प्रो कब्बडी लीग स्पर्धेच्या सामन्यात बंगळुरू बुल्स संघाने यू मुंबावर 30-26 असा विजय मिळविला. यु मुंबाच्या अर्जुन देशवाल (6गुण) आणि अभिषेक सिंग (5गुण) यांनी चमकदार कामगिरी केली पण ते संघाचा पराभव रोखण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे बंगळुरू बुल्सच्या पवन शेरावतने (11गुण) शानदार कामगिरी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

बंगळुरू बुल्स व यु मुंबा या दोन्ही संघात सुरुवातीपासून चांगलीच चुरस पाहायला मिळाली. 1-1 गुणासाठी दोन्ही संघातील खेळाडूंचा चांगलाच कस लागला. यु मुंबा संघावर एक वेळ सर्व बाद होण्याची वेळ आली होती मात्र मुंबईच्या बचाव फळीने संघाला अडचनीतून सावरले. तर बंगळुरू संघाने चांगला खेळ करीत मध्यंतरापर्यंत 13-11 अशी आघाडी घेतली. बंगुळूरू संघाच्या पवनने 3 गुण मिळवत चमक दाखविली.त्याला महेंद्रसिंग व सौरभ नंदल यांनी योगदान दिले. यु मुंबाच्या अर्जुन देशवालने 3 गुण मिळविले.

दुसर्‍या सत्रात यु मुंबाने पुनरागमन करीत गुणांची कमाई करीत संघाच्या गुण संख्येत भर घातली. यु मुंबाच्या चढाईपटू व बचावपटूनी चांगला खेळ करीत 26 व्या मिनिटाला बंगळुरूवर लोन चढवित आघाडी घेतली. पण बंगळुरूच्या शेरावतणे मुंबईकडून सामना हिरावून घेतला. सामना संपण्यास अवघे दीड मिनिट शिल्लक असताना बंगळुरूने लोण चढवित 28-25 अशी निर्णायक आघाडी घेतली. आपली आघाडी कायम ठेवीत बंगळुरूने 30-26 असा विजय मिळविला.

 

मागे

हसन अली भारताचा जावई होणार ?
हसन अली भारताचा जावई होणार ?

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली हा भारताचा जावई होणार आहे, अश्या बातम्य....

अधिक वाचा

पुढे  

प्रो कब्बडी 7 : आजचे सामने
प्रो कब्बडी 7 : आजचे सामने

आज प्रो कब्बडी 7 मध्ये दोन सामने खेळले जातील . पहिला सामना हरियाणा स्टीलर्स आ....

Read more