By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 04:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
जगभरासह देशावर कोरोनाचे संकट असताना भारताची दिग्गज महिला बॉक्सर आणि राज्यसभा खासदार मेरी कॉम राष्ट्रपतींच्या भेटीला गेल्याने टीकेची धनी होत आहेत. विदेशातून आलेल्या नागरिकांनी १४ दिवस एकांतवासात राहावे असे डब्ल्यूएचओचे निर्देश आहेत. हे नियम धाब्यावर बसवून मेरी कॉमने राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात सहभाग घेतला.
मेरी कॉम यांनी १३ मार्चला जॉर्डन येथून आशिया-ओसनिया ऑलम्पिकमध्ये क्वालीफायर खेळून परतली आणि १८ मार्चला राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात सहभागी झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला. त्यामध्ये मेरी कॉम दिसत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या खासदारांसाठी राष्ट्रपती भवनात ब्रेकफास्टचे आयोजन केले होते. याच दिवशी भाजपा खासदार दुष्यंत सिंह कोरोना वायरसग्रस्त गायिका कनिका कपूरला भेटले आणि राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहीले.
मी जॉर्डनमधून आली तेव्हापासून घरीच राहीले आणि केवळ राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात सहभागी झाले. मी खासदार दुष्यंत यांना भेटली नाही किंवा हात देखील मिळवला नसल्याचा खुलासा मेरी कोमने केलाय.
President Kovind hosted Members of Parliament from Uttar Pradesh and Rajasthan for breakfast at Rashtrapati Bhavan this morning. pic.twitter.com/Rou6GLrSHH
— President of India (@rashtrapatibhvn) March 18, 2020
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या ३०० च्या वर पोहचली आहे. आतापर्यंत ३१५ रुग्ण समोर आले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत हा आकडा २७ झाला आहे. केरळमध्ये ५२, राजस्थानमध्ये २५, महाराष्ट्रात ६४, तर पंजाब-गुजरातमध्ये १३ लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. आसाममध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. झारखंडहून आसाम पोहचलेल्या साडेचार वर्षांच्या चिमुकलीला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात शनिवारी १२ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वर पोहचलाय. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. १२ नवीन कोरोनाग्रस्तांपैकी, 8 रुग्ण मुंबई, २ पुणे, १ कल्याण आणि १ यवतमाळमध्ये आढळून आले. या १२ रुग्णांपैकी १० रुग्ण परदेशातून परतलेले आहेत.
शनिवारी परदेशातून आलेल्या 275 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्त देशांतून 1861 प्रवासी आले आहेत. रविवारी कुर्लामध्ये कोरोना संशयित 8 रुग्ण आढळून आले. हे सर्व संशयित दुबईहून मुंबईत आले आणि त्यांना मुंबईहून पुन्हा संध्याकाळी प्रयागराज येथे जायचं होतं. या सर्वांच्या हातावर home quarantineचा स्टॅम्प लावण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोरोनाच्या धोक्यामुळे दिल्लीत मिळणाऱ्या रेशनचा साठा वाढवला असून मोफत देण्यात निर्णय घेतला आहे. याअंतर्गत 72 लाख लोकांना प्रत्येक महिन्याला 7.5 किलो रेशन मोफत देण्यात येणार आहे. नाईट शेल्टरमध्ये मोफत जेवण देण्यात येणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी, दिल्लीतील वृद्ध, विधवा आणि अपंगांना मिळणारं पेन्शन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
Corona virus कोरोना व्हायरस साऱ्या जगभरात थैमाच घालत आहे. गेल्या काही दिवसांपासून ....
अधिक वाचा