By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 12:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
विंडीजच्या खेळपट्टी वर 3 सामन्याच्या मालिकेत प्रचंड फरकाने विजय मिळविल्यानंतर भारतीय गोलंदाज जसप्रीत बूमराह म्हणतो , “मला खूप आनंद झालाय. गोलंदाजी करताना आम्ही आक्रमक राहिलो त्याचा आम्हाला फायदा झाला. मी आणि इशांत दोघांनीही क्रीजचा चांगला वापर केला. त्यामुळे आम्हाला गतीसोबतच चांगला स्विंगदेखील मिळाला. गोलंदाजी करताना मला खूप परिश्रम घ्यावे लागत होते. इंग्लंड दौऱ्यापासून आऊटस्विंगचा जास्तीत जास्त वापर करत गेलो. त्याच्याच मला आज फायदा झाला”,
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने विंडीजला तब्बल 318 धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय मिळविला. 417 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ 100 धावांमध्ये आटोपला. या डावात जसप्रीत बुमराहने 8 षटके टाकून केवळ 7 धावांमध्ये 5 गडी टिपले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर बुमराहने एक विक्रम रचला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडिजमध्ये एका डावात 5 बळी टिपणारा बुमराह आशियातील पहिला गोलंदाज ठरला.
आंटिगा येथील कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा चौथ्याच द....
अधिक वाचा