By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2021 10:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन (Farmers Protest) पॉपस्टार रिहाना (Rihaana) , ग्रेटा थनबर्ग (Greta Therburg) आणि मिया खलीफा (Mia Khalifa) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) ट्विट करत ‘भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं’, अशा शब्दात त्यांना फटकारलं. तसंच गौतम गंभीरनेही (gautam Gambhir) मोदींवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना धारेवर धरलं. विराट कोहली (Virat Kohli), कुंबळे (Anil Kumble), धवन (Shikhar Dhawan), रैनाने (Suresh Raina) ट्विट करत शेतकरी आंदोलनावर (Farmer protest) आपली मतं मांडली आहेत. आता या सगळ्यावर आक्षेप घेत सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? , असा सवाल करत यापाठीमागे बीसीसीआय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम कार्ती चिदंबरम हे देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. बीसीसीआय आपल्या क्रिकेटपटूंना जबरदस्तीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावत आहे. हे खूपच बालीश आहे. बीसीसीआयने हे थांबवायला हवं किंबहुना असं करु नये, असं कीर्ती चिदंबरम यांनी म्हटलंय.
Dear @BCCI please stop forcing cricketers from tweeting propaganda. It’s very crude.
— Karti P Chidambaram (@KartiPC) February 3, 2021
दुसऱ्यांनी हस्तक्षेप करु नये- सचिन तेंडुलकर
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.
शेतकरी देशाचा अविभाज्य घटक, मार्ग निघेल- विराट कोहली
Let us all stay united in this hour of disagreements. Farmers are an integral part of our country and I'm sure an amicable solution will be found between all parties to bring about peace and move forward together. #IndiaTogether
— Virat Kohli (@imVkohli) February 3, 2021
मतभेदांच्या या काळात आपण संघटित राहूयात. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. मला खात्री आहे की दोन्ही बाजूंनी योग्य मार्ग लवकरच निघेल, असं ट्विट विराटने केलं आहे.
भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवू शकतो- अनिल कुंबळे
As the world's largest democracy, India is more than capable of taking her internal issues to amicable solutions. Onwards and upwards. #IndiaTogether#IndiaAgainstPropaganda
— Anil Kumble (@anilkumble1074) February 3, 2021
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवू शकतो आहे, असं मत मांडत अप्रत्यक्षपणे कुंबळेने मोदी विरोधकांवर निशाणा साधलाय.
निष्कर्षापर्यंत पोहोचणं गरजेचं- शिखर धवन
Reaching a solution that benefits our great nation is of utmost importance right now. Let’s stand together and move forward together towards a better and brighter future. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 3, 2021
सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं सध्या आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं.
… याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा- सुरेश रैना
We as a country have issues to resolve today and will have issues to resolve tomorrow as well, but that doesn't mean we create a divide or get perturbed by external forces. Everything can be resolved through amicable and unbiased dialogue. #IndiaAgainstPropaganda#IndiaTogether
— Suresh Raina
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्या चार सामन्यांच्या कसोटी मालिक....
अधिक वाचा