ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनामुळे बीसीसीआयचं मुख्यालय बंद, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' सुविधा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनामुळे बीसीसीआयचं मुख्यालय बंद, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' सुविधा

शहर : मुंबई

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये कडक पावलं उचलली जात आहेत. मुंबईमध्ये असलेलं बीसीसीआयचं मुख्यालयही मंगळवारपासून बंद करण्यात येणार आहे. बीसीसीआयने कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करायला सांगितलं आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुढचे आदेश येईपर्यंत बीसीसीआयने क्रिकेट स्पर्धा रद्द केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमधली सगळ्यात मोठी लीग असलेली आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे वानखेडे स्टेडियममध्ये असलेलं बीसीसीआयचं मुख्यालय बंद करण्यात येत असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे. आयपीएलशिवाय इराणी ट्रॉफी आणि महिला चॅलेंजर ट्रॉफी या स्पर्धाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मागे

कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर
कोरोनाच्या दहशतीमुळे IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर

कोरोना व्हायरसच्या देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनामुळे २१ वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू
कोरोनामुळे २१ वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू

Corona virus कोरोना व्हायरस साऱ्या जगभरात थैमाच घालत आहे. गेल्या काही दिवसांपासून ....

Read more