By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
खेळ मग तो कोणताही असो काही मोजक्या खेळाडूंना त्यांच्या नावा आधी ब्रँड असा शब्द जोडता येतो. भारतीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, एम.एस.धोनी, विराट कोहली आदी खेळाडूंना अशी कामगिरी करता आली. भारतीय क्रिकेटमध्ये असाच एक नवा ब्रँड तयार झाला आहे. अर्थात हा खेळाडू काही नवा नाही तर तो बराच अनुभवी आहे आणि सध्या त्याची कामगिरी सर्वोच्च शिखरावर आहे. भारतीय संघाचा सर्वात आक्रमक ओपनर अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma)ची मैदान आणि मैदानाबाहेरील कामगिरी ही अफलातून अशीच म्हणावी लागले. रोहित मैदानावर वनडे असो की टी-20 किंवा कसोटी सर्वच ठिकाणी धावांचा पाऊस पाडत आहे. त्यामुळेच कॉर्पोरेट जगतात रोहित हा एक नवा ब्रँड तयार झाला आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये रोहित शर्माने विक्रमी अशी कामगिरी केली होती. भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकता आला नसला तरी सर्वत्र चर्चा रोहितची होती. भारतीय संघाचे उपकर्णधापद त्यानंतर कसोटीमध्ये समामीवीर म्हणून रोहित केलेल्या कामगिरीमुळे तो एक ब्रँड झाला आहे. अनेक कंपन्यांनी रोहितमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या या सलामीवीराकडे सध्या 20 हून अधिक ब्रँड आहेत. यामध्ये सीएट टायर्स, आदिदास, हब्लोट वॉचेस, रेलिस्प्रे, रसना, शार्प इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्रीम 11 आदींचा समावेश आहे.
रोहितची अधिकृत ब्रँड व्हॅल्यू किती आहे याचा खुलासा झाला नसला तरी कॉर्पोरेट क्षेत्रामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितच्या कमाईमध्ये वर्षाला 75 कोटींची वाढ झाली आहे. रोहित सध्या प्रत्येक ब्रँडकडून एका दिवसासाठी एक कोटी रुपये घेतो. यामध्ये टिव्ही, वृत्तपत्र, डिजिटल आणि इव्हेंटचा समावेश असतो.
इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत रोहितने 5 शतक झळकावले होते. एका वर्ल्डकप स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. रोहितच्या या कामगिरीमुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे. आता कसोटीमधील सलामीवीर म्हणून त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची पाचही बोटं तुपात आहेत. केवळ क्रिकेटच नाही तर युवक आणि कौटुंबिक पातळीवर देखील रोहितचा प्रभाव पडत असल्याचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले.
कोलंबो, श्रीलंकेचा विख्यात गोलंदाज मुथय्या मुरलीधरण यांची श्रीलंकेच्या उ....
अधिक वाचा