By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2024 12:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काहीवेळा क्रिकेट मॅच दरम्यान अघटित घटना घडतात. दुर्देवी घटना होते. याआधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. आता ताजी घटना वर्षाच्या अखेरच्या दिवशीची म्हणजे 31 डिसेंबर 2023 ची आहे. यात एका क्रिकेटपटूबरोबर दुर्देवी घटना घडली.
क्रिकेट मॅच दरम्यान खेळाडूच्या मृत्यूच्या बातम्या याआधी सुद्धा आल्या आहेत. काही खेळाडूंनी मैदानावरच अखेरचा श्वास घेतला, प्रत्येकवेळी मृत्यूच कारण वेगवेगळ होतं. काहींचा मृत्यू चेंडू लागण्यामुळे झाला, तर काहींचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे. पण आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलतोय, त्याचा मृत्यू वर्षाच्या शेवटी झाला. ज्या खेळाडूचा मृत्यू झाला, त्याच नाव इंदल सिंह जाधव बंजारा आहे. त्याच वय फक्त 22 होतं. प्रश्न हा आहे की, ही घटना कधी झाली? हा सामना कुठे खेळला जात होता? वर्ष 2023 च्या अखेरच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला सामना सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. मध्य प्रदेशच्या खारगांव जिल्ह्यात एका गावात हा सामना सुरु होता. स्थानिक पातळीवर सामना सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली.
इंदल सिंह जाधव बंजाराचा मृत्यू कशामुळे झाला?. त्याच उत्तर आहे, हार्ट अटॅक. इंदल सिंह जाधव आपलं गाव काटकूटमध्ये एका स्थानिक क्रिकेट सामन्यात गोलंदाजी करत होता. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. इंदल सिंह जाधव बंजाराला मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आलं. बधवा सिविल हॉस्पिटलचे डॉक्टर विकास तलवरे यांनी बंजाराचा मृत्यू ह्दयविकाराच्या धक्क्याने झाल्याच सांगितलं. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह बंजारा कुटुंबाकडे सोपवण्यात आलाय.
त्याला झाडाच्या खाली बसवलं
गावातील रहिवाशी शीलाग्राम गुर्जर यांनी सांगितलं की, “बंजारा बरखड टंडा गावातील एका टीममधून खेळत होता. त्याच्या टीमने पहिली बॅटिंग केली होती. 70 धावा केल्या होत्या. बंजारा गोलंदाजीला आल्यानंतर त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला झाडाच्या खाली बसवलं. टीम जिंकल्यानंतर बंजाराने सहकाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तिथे नेल्यानंतर बधवाला सिविल रुग्णालयात रेफर केलं. सिविल हॉस्पिटलच्या वाटेवर असताना त्याचा रस्त्याच मृत्यू झाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना (IND vs SA 1st Test) सेंच्युरियनम....
अधिक वाचा