ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रोनाल्डोकडे जगातील सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 04, 2020 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रोनाल्डोकडे जगातील सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...

शहर : विदेश

पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने जगातिल सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. या कारचं नाव Bugatti La Voiture Noire असं आहे. पोर्तुगाल संघाला 36 व्या चॅम्पिअनशिपमध्ये यश मिळाल्यानंतर रोनाल्डोने ही कार खरेदी केली होती. या कारला खरेदी करण्यासाठी त्याला 75 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. विशेष म्हणजे रोनाल्डोने जी कार खरदे केली आहे ती कार तयार करणाऱ्या कंपनीने त्या कारसारख्या फक्त दहाच कार तयार केल्या आहेत. रोनाल्डोने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कारसोबत फोटो शेअर करत जगभरातील चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

रोनाल्डोकडे सध्या लॅम्बॉर्गिनी, बेंटली, मर्सिडीज, रोल्स रॉईस, फरारी अशा कंपन्यांच्या कार आहेत. त्यानंतर आता त्याने बुगाटी कार खरेदी केली आहे. मात्र, ही कार त्याला कंपनीकडून पुढच्या वर्षी म्हणजे 2021 साली मिळणार आहे. या कार खरेदीनंतर रोनाल्डोजवळ असणाऱ्या सर्व कारची एकूण किंमत जवळपास 264 कोटी आहे.

Bugatti La Voiture Noire ही कार जगातील सर्वात महागडी आणि सर्वात वेगवान कार आहे. या कारला फ्रान्सची सुपरकार बनवणारी कंपनी बुगाटीने (Bugatti) बनवलं आहे. 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ही कार प्रदर्शित करण्यात आली. या कारची ऑन रोड किंमत 133 कोटी आहे.

Bugatti La Voiture Noire ही एक सुपर स्पोर्ट्स कार आहे. ही कार 2.4 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. या कारचा सर्वाधिक वेग 420 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीच्या मते शहरात या कारला 100 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 35.2 लीटर पेट्रोलची गरज असेल.

La Voiture Noire हा एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ ब्लॅक कारअसा होतो. या कारचं डिझाईन 1930 सालच्या 57SC Atlantic या कारवरुन बनवण्यात आलं आहे. या कारचं डिझाईन बुगातीचे संस्थापक एटोर बुगाती (Ettore Bugatti) यांचा मुलगा जीन बुगातीने (Jean Bugatti) केलं.

 

 

मागे

IPL 2020 ला केंद्र सरकारची परवानगी, UAE मध्ये रंगणार आयपीएल
IPL 2020 ला केंद्र सरकारची परवानगी, UAE मध्ये रंगणार आयपीएल

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक संपली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 | दुबईत इतक्या दिवसांसाठी खेळाडू राहणार क्वॉरंटाईन; BCCI च्या निर्णयावर सर्व संघांची संमती
IPL 2020 | दुबईत इतक्या दिवसांसाठी खेळाडू राहणार क्वॉरंटाईन; BCCI च्या निर्णयावर सर्व संघांची संमती

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13व्या सीझनचं आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ....

Read more