By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याविषयी विश्वचषकातील पराभवानंतर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. तो निवृत्त होणार असे म्हटले जात आहे. त्यातच आता त्यानी दोन महिने सुट्टी घेतली आणि थेट लष्करात खडतर प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंतच्या काळात लेफ्टनन (मानद) धोनी 106 टी.ए. बटालियन मध्ये सामील होणार आहे. व्हिक्टर फोर्सचा भाग असलेल्या या यूनिटची पोस्टिंग काश्मीर खोर्यात असणार आहे. अधिकार्यानी केलेल्या विनंतीनुसार आणि लष्कर मुख्यालयाकडून मिळालेल्या मान्यतेनंतर धोनी पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्यूटि यांसारख्या जबाबदार्या सांभाळेल आणि सैनिकांसोबत राहील.
भारताचा स्टार टेनिस खेळाडू दिवीज शरणने ब्रिटनची स्टार टेनिस खेळाडू समंथ....
अधिक वाचा