ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिनेश मोंगियाचा क्रिकेटला रामराम

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 01:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिनेश मोंगियाचा क्रिकेटला रामराम

शहर : delhi

भारताचा क्रिकेटपट्टू दिनेश मोंगियाने वयाच्या 42 वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृती जाहीर केली आहे. 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघात दिनेश मोंगिया विश्वचषकात अंतिम सामना खेळला होता. तर 2007 मध्ये पंजाब विरूद्ध तो शेवटचा सामना खेळला होता.

 1995-96 मध्ये मोंगियाने पंजाबकडून पदार्पण केल होते. 2002 मध्ये झीम्बोंबे विरूद्ध खेळताना त्याने 159 धावा केल्या होत्या. या त्याच्या धावांमुळे भारतीय संघाची स्थिती मजबूत झाली होती.  मात्र विश्वचषकानंतर त्याने काही खास कामगिरी केली नाही.  त्यानंतर भारतीय क्रिकेट लीगमध्ये खेळल्याच्या कारणावरून बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली. तेव्हापासून तो क्रिकेटपासून लांब राहिला. आपल्या कारकीर्दीत मोंगिया 57 वन डे आणि एक टी-20 सामना खेळला आहे. यात त्याने जवळपास 1 हजार 268 धावा केल्या आहेत.

 

 

मागे

55 वर्षानंतर भारतीय टेनिस खेळाडू करणार पाकिस्तानचा दौरा
55 वर्षानंतर भारतीय टेनिस खेळाडू करणार पाकिस्तानचा दौरा

सध्या भारत पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय संबंध ताणलेले आहेत. कश्मीर मुद....

अधिक वाचा

पुढे  

मुकुंद कर्णिक यांचे निधन
मुकुंद कर्णिक यांचे निधन

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे बुधवार सायंकाळी हृदयविकाराच्य....

Read more