ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

युवराजच्या निवृत्तीवर सचिन आणि सेहवागची अशी प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

युवराजच्या निवृत्तीवर सचिन आणि सेहवागची अशी प्रतिक्रिया

शहर : मुंबई

टीम इंडियाचा स्फोटक खेळाडू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या निवृत्तीची घोषणा युवराजने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान दिली. निवृत्तीच्या घोषणेनंतर युवराजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याच्या माजी सहकाऱ्यांनी तसेच चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील ट्वीटद्वारे युवराज सिंग सोबतचा खांदयावर हात टाकलेला एक फोटो ट्विट केला आहे.

सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरने देखील युवराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने म्हटलं की, तुझी क्रिकेट कारकिर्द खूप छान होती. निर्णायक क्षणी तु टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली. तुला तुझ्या इनिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी तुझे मनपूर्वक धन्यवाद.

काय म्हणाला सेहवाग

अनेक खेळाडू येतील आणि जातील. पण युवराज सारखा खेळाडू शोधून सापडणार नाही. युवराजने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. आजारावर मात केली. बॉलर्सना धु-धु धुतलं. चाहत्यांची मनं जिंकली. आपल्या लढाईनं आणि इच्छाशक्तीने अनेकांचा प्रेरणा स्थान झाला. पुढील जीवनासाठी शुभेच्छा युवी.' अशा भावनिक शब्दात सेहवागने युवराजच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली.

                                                                   

 

मागे

युवराज सिंगने म्हटलं, या एका गोष्टीची खंत नेहमी राहिल
युवराज सिंगने म्हटलं, या एका गोष्टीची खंत नेहमी राहिल

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या निवृत....

अधिक वाचा

पुढे  

टीम इंडियाला मोठा झटका, गब्बर दुखापतीमुळे बाहेर
टीम इंडियाला मोठा झटका, गब्बर दुखापतीमुळे बाहेर

वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच....

Read more