By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 08:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
आज चेन्नई येथे सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यात आज पॉईंट टेबलमधील टॉपच्या स्थाना असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज लढणार आहेत. घरच्या मैदानावर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या आयपीएलमध्ये नाणेफेक जिंकली की गोलंदाजी घ्यायची आणि टार्गेट चेस करण्याची परंपराचा सुरु झाली आहे. गेल्या चारही सामन्यात आंद्रे रसेलने अखेरच्या काही षटकात फलंदाजीला येत धुमाकूळ घातला होता. आता हे रसेलवादळ चेन्नईला येवून थडकले आहे. पण, त्याचा सामना हा चतुर धोनी आणि त्याचे अव्वल दर्जाचे स्पिनर यांच्याशी होणार आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते रसेलला रोखण्यासाठी स्पिनर्सचा चांगल्या पद्धतीने वापर करणे संयुक्तिक ठरेल.
कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूची यंदाच्या आयपीएलमध्ये पराभवाची मालिका क....
अधिक वाचा