By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
24 ऑगस्ट 1971 रोजी भारतीय क्रिकेट संघाने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड मध्ये ओव्हल मैदानावर तिसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडला पराभूत करीत तीन सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. परदेश दौर्यावरील हा भारतीय संघाचा पहिला विजय होता. 1932 पासून क्रिकेट खेळणार्या भारताला इंग्लंडवर मात करण्यासाठी 39 वर्षे लागली. या घटनेला 48 वर्षे पूर्ण झाली. आज भारतीय क्रिकेट संघाने दबदबा निर्माण केला आहे. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघाने सिद्ध करून दाखवीली आहे.
भारतीय संघाने 1932 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये खेळण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून इंग्लंडला पुढच्या 37 वर्षात एकदाही पराभूत करता आल नव्हतं. उलट इंग्लंडने भारताविरुद्ध सलग 26 कसोटी सामने जिंकले होते. त्यामुळे भारतातही तेवढ्या उत्सुकतेने क्रिकेटकडे पहात नव्हते. पण अजित वडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने 24 ऑगस्ट 1971 रोजी धूळ चारली आणि भारतीय क्रिकेट संघाने कात टाकली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्यावेळी इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. त्याचे प्रतिउतर देताना भारताने सर्व बाद 284 धावा केल्या. इंग्लंडला 71 धावांची आघाडी मिळाली. दुसर्या डावात भारताने इंग्लंडच्या संघाला अवघ्या 101 धावात गुंडाळले. भागवत चन्द्रशेखरच्या फिरकीसमोर इंग्लिश फलंदाजानी नांगी टाकली. चन्द्रशेखरने 38 धावा देवून तब्बल 6 गाडी बाद केले होते. 173 धावांचे लक्ष घेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडे दीड दिवसांचा वेळ होता. इंग्लंडचा कर्णधार लिंगवार्थणे टिच्चून गोलंदाजी केली खरी पण संथ खेळपट्टीवर भारतीय फलंदाजानीही संयमी खेळ केला. अजित वाडेकर 45, दिलीप सरदेसाई यांनी 40 केल्या , फारूख इंजिनियर 28 धावांवर नाबाद राहिले होते. तोच हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहिला गेला आहे. त्यानंतर भारतीय संघास सुनील गावस्कर पासून विराट कोहलीपर्यंत अनेक प्रतिभावंत खेळाडू मिळाले आणि भारतीय क्रिकेटला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे.
राज्य पातळीवर बॅडमिंटन, क्रिकेट, खो खो आणि अथ्लेटिक्ससारख्या खेळांसाठी प्र....
अधिक वाचा