By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतीय महिला टीमने वेस्ट इंडीजला तिसऱ्या टी-२० सामन्यांत ७ गड्यांनी पराभूत केले. टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत ३-० ने अजेय आघाडी घेतली. भारताने सातव्यांदा ३ पेक्षा अधिक सामन्याची मालिका जिंकली. वेस्ट इंडीजने प्रथम खेळताना २० षटकांत ७ बाद ५९ धावा काढल्या. ही टी-२० मधील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी विंडीजने २०१२ मध्ये इंग्लंड विरुद्ध ८ बाद ७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १६.४ षटकांत ३ गडी गमावत ६० धावा करत विजय साकारला. जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद ४० धावा केल्या. पाहुण्या विंडीज टीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघावर सुरुवातीपासून दडपण आले. २० पैकी १८ षटके आपल्या फिरकीपटूंनी टाकले. राधा यादवने ४ षटकांत ६ धावा देत २ विकेट घेतल्या. दीप्ती शर्माने १२ धावा देत २ विकेट घेतल्या. भारतीय फिरकीपटूंनी १८ षटकांत ५० धावा देत ७ बळी घेतले. विंडीजच्या ५९ धावा; टी-२० मध्ये नीचांकी
वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्यांदा ३ सामने जिंकले विरुद्ध : मॅच : विजय : पराभव : यजमान श्रीलंका : 5 : 4 : 0 : श्रीलंका बांगलादेश : 3 : 3 : 0 : देश बांगलादेश : 3 : 3 : 0 : बांगलादेश श्रीलंका : 3 : 3 : 0 : देश द. अाफ्रिका : 5 : 3 : 1 : अाफ्रिका द. अफ्रीका : 4 : 3 : 1 : देश विंडीज : 5* : 3 : 0 : विंडीज
राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये भारताची ओपनर जोडी शिखर धवन आणि रोहि....
अधिक वाचा