ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयसीसी मॅच रेफरीच्या पॅनलमध्ये समावेश हाेणारी पहिली भारतीय महिला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयसीसी मॅच रेफरीच्या पॅनलमध्ये समावेश हाेणारी पहिली भारतीय महिला

शहर : देश

आंध्र प्रदेशातल्या राजमुंदरीमध्ये जन्मलेल्या गंडीकाेटा सर्व लक्ष्मी म्हणजे जीएस लक्ष्मीचे वडील झारखंड - जमशेदपूरमध्ये नाेकरी करत हाेते. हायस्कूलच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने लक्ष्मीला महिला महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी मनाई केल्यावर लक्ष्मीला क्रीडा काेट्यातून बाॅलर काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला. एका मुलाखतीमध्ये लक्ष्मी म्हणाली, ती अभ्यासाच्या बळावर काॅलेजमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरली हाेती. त्या वेळी प्राचार्यांनी विचारले की, तुझ्याकडे आणखी काय प्रतिभा आहे? मी माझ्या भावांबराेबर क्रिकेट खेळत हाेते. माझे हे काैशल्य बघितले. माझ्यात गाेलंदाजीची प्रतिभा हाेती. त्या बळावर मला काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला. लक्ष्मीला १९८९ मध्ये दक्षिण मध्य रेल्वेमध्ये नाेकरी लागल्यानंतर ती हैदराबादला आली आणि क्रिकेट खेळू लागली.

एका परंपरागत दक्षिण भारतीय ब्राह्मण कुटुंबातील लक्ष्मीचा १९९१ मध्ये जया प्रकाश यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्याच दिवशी त्यांना उर्वरित भारतातून खेळण्याची संधी मिळाली. परंतु कुटुंब आणि मुलीच्या जन्मामुळे त्यांना तीन वर्षांपर्यंत खेळापासून दूर राहावे लागले. १९९४ मध्ये लक्ष्मीने पुन्हा खेळणे सुरू केले. या तिच्या संपूर्ण वाटचालीत लक्ष्मीची आई विजयालक्ष्मी यांची तिला पूर्ण साथ मिळाली आणि तिची मुलगी प्रनातीचे पालनपाेषण केले.लक्ष्मी यांचे टाेपणनाव लक्ष्य आहे. त्या आंध्र महिला, बिहार महिला, रेल्वे महिला, पूर्व क्षेत्र महिला आणि दक्षिण महिला यासह अनेक स्पर्धा खेळल्या आहेत.

ती मध्यमगती गोलंदाज व फलंदाज म्हणून खेळत आहे. १९९९ मध्ये भारतीय संघाच्या इंग्लंड दाैऱ्यासाठी निवड झाली होती, परंतु देशासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

२००४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर लक्ष्मीने क्रिकेटचे प्रशिक्षण देणे सुरू केले. त्याच वेळी २००८ मध्ये जेव्हा बीसीसीआयने घरगुती महिला क्रिकेटमध्ये महिला रेफरी घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी रेफरी म्हणून रुजू व्हायला सुरुवात केली. २००८-२००९ पासून मॅच रेफरीची भूमिका साकारणाऱ्या ५१ वर्षीय लक्ष्मीचा मॅच रेफरीचा मार्ग तेव्हा खुला झाला जेव्हा बीसीसीआयने महिला क्रिकेट अधिकारी घेण्यासाठी देशातल्या पाच महिलांची निवड केली. त्यापैकी लक्ष्मी एक हाेती. काही काळ आधी आयसीसीआय मॅच रेफरीसाठी आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये समावेशाने चर्चेत आलेल्या लक्ष्मी यांना या यशाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, मला मिळालेल्या या संधीमुळे मुलींना लग्न, मुलेबाळे व निवृत्तीनंतरही महिलांना संधी आहेत याची जाणीव हाेईल.

मागे

IPL Auction  : हे खेळाडू झाले मालामाल
IPL Auction : हे खेळाडू झाले मालामाल

आयपीएल लिलाव प्रवीण तांबे- २० लाख रुपये- कोलकाता ओशेन थॉमस- ५० लाख रुपये- र....

अधिक वाचा

पुढे  

अन् अनाथ मुलांसाठी ‘सांताक्लॉज’ झाला विराट
अन् अनाथ मुलांसाठी ‘सांताक्लॉज’ झाला विराट

            अवघ्या चार दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे. प्रत्येक लहान म....

Read more