ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टीम इंडियाला मोठा झटका, गब्बर दुखापतीमुळे बाहेर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टीम इंडियाला मोठा झटका, गब्बर दुखापतीमुळे बाहेर

शहर : मुंबई

वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे पुढील तीन आठवड्यांसाठी मुकावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.

गब्बर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०९ बॉलमध्ये ११७ रनची दमदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान शिखरच्या डावा अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर नॅथन कूल्टर नाईलच्या बॉलिंगवर धवनला ही दुखापत झाली. नॉटिंगघममध्ये करण्यात आलेल्या उपचारदरम्यान त्याचा बोट फ्रॅक्चर असल्याचे पुढे आले.

यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मॅचमध्ये धवन फिल्डींग करण्यासाठी देखील मैदानात उतरला नाही. त्याऐवजी रविंद्र जडेजा मैदानात फिल्डिंग करण्यासाठी आला होता.

शिखरच्या जागी कोण?

शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे त्याला न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या मॅचेसला मुकावे लागणार आहे. त्यामुळे शिखर धवनच्या जागेवर केएल राहुल सलामीला खेळायला येऊ शकतो.

धवनची आयसीसी स्पर्धांमधील कामगिरी

शिखर धवनने आयसीसीच्या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. शिखरने २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ५१.५० च्या सरासरीने ४१२ रन केल्या. ज्यात शतकांचा समावेश होता. तर २०१३-२०१७ चॅम्पिअन ट्रॉफीमध्ये शिखर धवनने धमाल कामगिरी केली होती. यात त्याने ७७ च्या सरासरीने  ७०१ रन केले होते. तीन शतकांचा समावेश होता.

 

मागे

युवराजच्या निवृत्तीवर सचिन आणि सेहवागची अशी प्रतिक्रिया
युवराजच्या निवृत्तीवर सचिन आणि सेहवागची अशी प्रतिक्रिया

टीम इंडियाचा स्फोटक खेळाडू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : ...तर क्रिकेटमधून निवृत्ती घेईन, अफगाणिस्तानच्या खेळाडूचे बोर्डावर आरोप
World Cup 2019 : ...तर क्रिकेटमधून निवृत्ती घेईन, अफगाणिस्तानच्या खेळाडूचे बोर्डावर आरोप

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजाद याने त्यांच्या क्रिकेट बोर्डाला न....

Read more