By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 28, 2020 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना बुधवारी २९ जानेवारी रोजी होणार आहे. ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकल्यास ऐतिहासिक विजय ठरणार असून आतापर्यंत भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध एकही द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकलेली नाही.
टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात ६ आणि दुसऱ्या सामन्यात ७ विकेटनी न्यूझीलंडचा पराभव केला होता. न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदा टी-२० मालिका जिंकण्याची विराटच्या नेतृत्त्वाखालील संघाला सुवर्ण संधी मिळणार आहे. हॅमिल्टन येथे होणाऱ्या सामन्यात भारताला सावध राहण्याची गरज आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या मालिकेत भारताचा २-१ असा पराभव झाला होता. त्यापैकी ४ मध्ये न्यूझीलंडने तर ३ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
ऑकलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघामध्ये होणार्या पाच&nbs....
अधिक वाचा