By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 07:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो. तो नेहमीच आपल्या मैत्रीणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. मग या फोटोंमुळे हार्दिकच्या आयुष्यात कुठली नवी तरुणी डोकावतेय याबाबतच्या उलट सुलट चर्चा क्रिकेट रसिकांमध्ये रंगू लागतात.
परंतु यावेळी मात्र हार्दिकने कुठलाही गोंधळ निर्माण न करता थेट आपल्या गर्लफ्रेंडचे नाव घोषित केले आहे. त्याने एका सुंदर तरुणीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन तिच्यासोबतच्या नात्याची पुष्टी केली आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून नच बलीये फेम नताशा स्टॅन्कोविक आहे. या सर्बियन मॉडेलसोबत हार्दिकने गुपचूप आपला साखरपुडा देखील उरकला आहे.
हार्दिकने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन आपल्या भविष्यकालीन पत्नीची माहिती चाहत्यांना दिली. या फोटोमध्ये दोघे एका बोटमध्ये बसले आहेत. दरम्यान नताशा बोटातील अंगठी दाखवत आहे. या फोटोवर हार्दिकने “मे तेरा, तु मेरी जाने सारा हिंदुस्तान” असे स्टेटस लिहिले आहे. गेले अनेक महिने दोघांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चा सुरु होत्या.
मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबाबत कधीच खुलेपणाने कुठलेही वक्तव्य केले नव्हते. परिणामी या फोटोमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वी हार्दिक पांड्याचे नाव अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशी जोडले गेले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण कायम तापलेले असते. ....
अधिक वाचा