By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 07:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - या वर्षी महाराष्ट्रची ६३ वी केसरी स्पर्धा पार पडली. या भव्य केसरी स्पर्धेचा दावेदार हर्षवर्धन सदगीर ठरला असून तो कुस्ती स्पर्धेतील नाशिकच्या खुल्या गटातून होता. लातूरच्या शैलेश शेळके याच्यासोबत कुस्तीचा डाव रंगला असून हर्षवर्धनने ३-२ अशी खेळी करत त्यावर मत केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, हर्षवर्धन आणि शैलेश यांच्यात रंगलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली. दोघेही काकांच्या तालमीत असल्याने त्यांना एकमेकांचे डाव माहीत होते. त्यामुळे ही लढत अधिक रंगतदार झाली होती.
हर्षवर्धन हा गेल्या ६ महिन्यापासून कसून सराव करत होता. २००९ पासून तो पवार यांच्या तालमीत आहे. शैलेश देखील दररोज सहा तास मेहनत करत होता. २०१५ पासून तो देखील काकांच्या तालमीत सराव करत आहे.
टी-20 मालिकेतील पहिली लढत पावसात ‘वाहून’ गेल्यानंतर आज दुसरी....
अधिक वाचा