By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 04, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आयसीसीने नुकतीच टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आयसीसीने पहिल्यांदाच ८० टीमची यादी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताची घसरण झाली आहे. तर भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. आयसीसीने ही सुधारीत क्रमवारी जाहीर करण्याआधी भारतीय टीम टी-२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती.आयसीसीच्या नव्या यादीत भारतीय टीम पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. तर पाकिस्तानने पहिला क्रमांक पटकावला आहे. पाकिस्तानचे टी-२० क्रमवारीत सध्या २८६ पॉईंट आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. आफ्रिकेचे २६२ पॉईंट्स आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आहे. या दोन्ही टीमचे २६१ पॉईंट्स इतके आहेत.यानंतर भारताचा पाचवा क्रमांक लागतो. भारताकडे सध्या २६० पॉईंट्स आहेत. भारताची तब्बल दुसऱ्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
आयसीसीच्या टी-२० क्रमवारीनुसार पहिल्या १० टीम
१. पाकिस्तान – २८६ पॉईंट्स
२. दक्षिण आफ्रिका – २६२ पॉईंट्स
३. इंग्लंड – २६१ पॉईंट्स
४. ऑस्ट्रेलिया – २६१ पॉईंट्स
५. भारत – २६० पॉईंट्स
६. न्यूझीलंड – २५४ पॉईंट्स
७. अफगाणिस्तान – पॉईंट्स
८.श्रीलंका – २२७ पॉईंट्स
९. विंडीज – २२६ पॉईंट्स
१०. बांगलादेश – २२० पॉईंट्स
पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज मोहालीच्या पीसीए आयएस बिंद्रा स....
अधिक वाचा