By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 02:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
केपटाऊन - भारताच्या १९ वर्षाखालील संघाने आयसीसी स्पर्धेचे २०००, २००८, २०१२ आणि २०१८ असे चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर दोन वेळा उपविजेतेपद मिळवले आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेत आयसीसीचा १९ वर्षाखालील वर्ल्ड कप सुरू होणार आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी वनडे राजकोट येथे सुरु आहे. आयसीसीच्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेला येत्या रविवारपासून होणार आहे.
चार वेळा विजेतेपद मिळवले असताना या स्पर्धेत भारताच्या विजयाची सरासरी ७६.३१ इतकी आहे. भारतीय संघाचे नेतृत्व प्रियम गर्गकडे कडेअसून त्याच्याकडून मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आहे. स्पर्धेतील १६ संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून भारतीय संघाचा समावेश ए ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपानचा संघ आहे. प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ सुपर लीग स्टेजला पात्र ठरतील. दरम्यान, अंतिम सामना ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
आयसीसीच्या या स्पर्धेतूनच भारतीय संघाला विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग (स्पर्धा १९९८), युवराज सिंग (२०००), शिखर धवन (२००४), रोहित शर्मा (२००६), रविंद्र जडेजा (२००६ आणि २००८) हे क्रिकेटपटू मिळाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा विचार केल्यास ब्रायन लारा, इंझमाम-उल-हक, सनथ जयसूर्या, मायकल क्लार्क, ब्रॅडन मॅकलम, बाबर अजम, ख्रिस गेल या खेळाडूंनी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेतूनच स्वत:ची ओळख निर्माण केली होती.
भारतीय संघाचा पहिला सामना १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे. दुसरा सामना २१ जानेवारी रोजी जपान तर तिसरा सामना २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१९ -२० या वर्षासाठी क्रिक....
अधिक वाचा