By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 10:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
अंडर-19 विश्वचषक 2020 च्या सुरुवातीलाच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार. यात भारतीय संघाचा अ गटात समावेश आहे.
17 जानेवारीपासून याची सुरुवात होणार असून 9 फेब्रुवारीला अंतिम सामना रंगेल. या विश्वचषकात भारतासह एकूण 16 देश सहभागी होणार आहेत. या संघाची चार-चार अशा ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आलीय. याचसोबत सर्व संघाना सरावासाठी आयसीसीने 12 ते 15 जानेवारीदरम्यान जोहान्सबर्ग आणि प्रिटोरीया येथे सरावसामने आयोजित केले आहेत.
2020 विश्वचषकातील संघ व ग्रुप
अ गट – भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान
ब गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया
क गट – पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड
ड गट – अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, युएई, कॅनडा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे माजी कर्णध....
अधिक वाचा