ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Ind vs Aus: 338 रनवर ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 08, 2021 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Ind vs Aus: 338 रनवर ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट

शहर : मुंबई

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे दिवसभर 55 षटकांचा खेळ झाला. दुसर्‍या दिवशी सामना अर्ध्या तासापूर्वी सुरू झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्ससह 166 धावांवर खेळण्यास सुरवात केली, पण स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 105.4 षटकांत सर्व गडी गमावून 338 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, बातमी लिहिण्यापर्यंत भारताने कोणत्याही विकेटशिवाय 2 ओव्हरमध्ये 5 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.

सामन्याच्या दुसर्‍या दिवशी स्मिथने शतक झळकावले. 200 चेंडूंचा सामना करून 13 चौकारांच्या मदतीने त्याने 27 वे कसोटी शतक पूर्ण केले. पहिल्या दिवशी झालेल्या पावसामुळे झालेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी दुसर्‍या दिवशी अर्धा तास आधी सामना सुरू झाला. दुसर्‍या दिवशीही पावसाचा व्यत्यय आला. 66 व्या ओव्हरमध्ये सामना थोडा वेळ थांबवावा लागला. 5 मिनिटांनंतर सामना पुन्हा सुरू झाला. रविंद्र जडेजाने दुसर्‍या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले. 91 धावांवर खेळत असलेल्या लाबुशाला कर्णधार अजिंक्य रहाणेने झेलबाद केले.

त्यानंतर स्मिथने कसोटी कारकीर्दीतील 30 वे अर्धशतक झळकवून मालिकेचा पहिला भाग पूर्ण केला. त्याने 116 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने अर्धशतक गाठले. मॅथ्यू वेडने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला पण १६ बॉलवर १३ रन करत तो आऊट झाला. यानंतर कर्णधार टिम पेनला दुपारच्या जेवणानंतर बुमराहने परत पाठवले. पॅट कमिन्स जडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला तर मिचेल स्टार्कला नवदीप सैनीच्या बॉलवर 24 धावांवर शुभमन गिलकडून झेलबाद झाला. नॅथन लिऑनला बाद करून जडेजाने भारताला 9 वे यश मिळवून दिले. रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथचा १३१ रनवर रनआऊट करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.

पहिल्याच दिवशी दोन विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशाने डाव सांभाळला. मार्नसने अर्धशतक झळकावत संघाची धावसंख्या 150 पर्यंत नेली. पहिल्या दिवशी दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला केवळ 5 धावा करता आल्या तर कसोटीत पदार्पण करणारा दुसरा सलामीवीर विल पुकोव्स्कीने 62 धावा केल्या.

 

 

मागे

Sourav Ganguly | सहा दिवसांच्या उपचारानंतर ‘दादा’ठणठणीत, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज
Sourav Ganguly | सहा दिवसांच्या उपचारानंतर ‘दादा’ठणठणीत, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (BCCI President Sourav Ganguly) ....

अधिक वाचा

पुढे  

जखमा झेलूनही झुंजला, ड्रेसिंग रुममध्ये येताच कर्णधार रहाणेकडून अश्विनला कडकडून मिठी
जखमा झेलूनही झुंजला, ड्रेसिंग रुममध्ये येताच कर्णधार रहाणेकडून अश्विनला कडकडून मिठी

हनुमा विहारी (Hanuma vihari) आणि आर. अश्विन (R Ashwin) यांच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाने स....

Read more