By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 13, 2021 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा धुव्वा उडवणाऱ्या इंग्लंडनं दुसऱ्या टेस्टसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडननं आपल्या टीममध्ये 3 बदल केले आहेत. हे चार बदल भारतासाठी फायद्याचे ठरणार असून चेन्नई कसोटी सामन्यात संघाच्या पथ्यावर पडणार आहेत. फास्ट बॉलर जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चरला आणि स्पीन बॉलर डॉमिनिक बेसला दुसऱ्या सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले आहे.
या चारही खेळाडूंच्या जागी नवे खेळाडू संघात आले आहेत. फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड, ओली स्टोन आणि स्पीन बॉलर मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. सध्या इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडननं आपल्या संघाची घोषणा केली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवरच शनिवारी टेस्ट मॅच रंगणार आहे.
कोणकोण आहे इंग्लंडच्या संघात?
रोरी बर्न्स, डोमिनिक सिबली, डेनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), जॅक लीच, फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड, ओली स्टोन आणि स्पीन बॉलर मोईन अली खेळणार आहेत.
इंग्लंडच्या संघाला चेन्नईतील मैदानात हरवण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे. दुसरा कसोटी सामना जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांमध्ये जर भारतीय संघ जिंकला तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यासाठी पोहोचेल. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझिलंड असा होऊ शकतो. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पोहोचण्याचं भारतीय संघासमोर मोठं आव्हान आहे.
क्रीडापटू असणार्यांसाठी देशसेवेसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. भारती....
अधिक वाचा