ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IND VS ENG: मॅचमध्ये भडकला, Virat Kohli, घेतला अम्पायरशी पंगा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2021 08:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IND VS ENG: मॅचमध्ये भडकला, Virat Kohli, घेतला अम्पायरशी पंगा

शहर : मुंबई

टीम इंडिया आणि इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात खेळला जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पूर्ण पकड घेतल्याचे दिसतेय. सामना शेवटच्या वळणावर पोहोचला आहे. हा सामना जिंकून भारतीय खेळाडू मालिका 1-1 अशी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडियाची स्थिती मजबूत होत असताना मैदानावर असे काहीतरी घडले जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताची स्थिती अधिक मजबूत होऊ शकली असती. परंतु जो रूटला (Joe Root) एक्झर पटेलच्या चेंडूवर फील्ड अम्पायर नितीन मेननमुळे (Nitin Menon)जीवनदान मिळाले.

दिवसाच्या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू अक्षर पटेलने जो रुटला टाकला आणि जोरदार अपील केलं. पण फिल्ड अम्पायरनी त्याला नॉट आऊट दिले. त्यानंतर कॅप्टन विराट कोहलीने डीआरएसचा वापर केला. बॉल स्टम्पला लागला होता. पण अम्पायरने नॉट आऊट दिले होते.

विराट अम्पायरवर रागावला

जो रुटला नॉट आऊट दिल्याचे पाहून विराट कोहलीला राग अनावर झाला. थर्ड अम्पायरचा निर्णय आल्यानंतर विराट ऑनफिल्ड अम्पायर मेननकडे गेला आण दोघांमध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात रविचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकलं. अश्विनने त्याच्या टेस्ट करिअरमधील पाचवं शतक ठोकलं. सोबतच त्याने टीका करणाऱ्या लोकांना ही उत्तर दिलं. रविचंद्रन अश्विनसाठी शतक ठोकणं इतकं सोपं नव्हतं. कारण टीम इंडियाचे चांगले चांगले बॅट्समन या पीचवर टीकू शकले नाही. इशांत शर्माची विकेट 237 रनवर पडल्यानंतर दहाव्या विकेटसाठी अश्विनने शानदार कामगिरी केली. चैन्नईच्या क्रिकेट चाहत्यांना त्याने निराश केलं नाही. त्याने त्याच्या होम ग्राऊंडवर शतक ठोकत त्याच्या चाहत्यांना ही खूश केलं.

मागे

India vs England 2nd Test | इंग्लंडच्या गोलंदाजांची अफलातून कामगिरी, 66 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
India vs England 2nd Test | इंग्लंडच्या गोलंदाजांची अफलातून कामगिरी, 66 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये ....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2021| ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव
IPL 2021| ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

गुरुवारी चेन्नई येथे जाहीर झालेल्या खेळाडूंच्या लिलावात इंडियन प्रीमियर ....

Read more