ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे टेस्टमध्ये पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2024 09:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे टेस्टमध्ये पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय

शहर : पुणे

पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.

 भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून शनिवारी पुण्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. न्यूझीलंडने 113 धावांनी सामना जिंकला असून यासह सीरिजमध्ये  2-0 ने आघाडी घेतली आहे. तब्बल 12 वर्षांनी टीम इंडियाने भारतात टेस्ट सीरिज गमावली. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फार नाराज झाला. तर विराट कोहली (Virat Kohli) देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही. आता तिसऱ्या टेस्टपूर्वी हे दोन्ही अनुभवी फलंदाज ब्रेकवर गेले आहेत. 

रिपोर्टनुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे तिघे आपल्या कुटुंबासोबत शनिवारी सामना संपल्यावर मुंबईला रवाना झाले. तर टीम इंडियाचे उर्वरित खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफ रविवारी मुंबईला परततील. 1 नोव्हेंबर पासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना खेळवला जाणार असून तिसऱ्या टेस्टच्यापूर्वी दोन दिवस खेळाडूंना ब्रेक दिला जाणार आहे. 

तिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी दोन दिवसांच्या ब्रेकनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू 30 आणि 31ऑक्टोबरला होणाऱ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभाग होतील. हे  प्रॅक्टिस सेशन अटेंड करणं टीम इंडियाचा सर्व खेळाडूंसाठी अनिवार्य असणार असून यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही. सहसा असे दिसून येते की वरिष्ठ खेळाडू आणि वेगवान गोलंदाज दुखापती टाळण्याबरोबरच वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन सरावात जास्त भाग घेत नाहीत किंवा हलके व्यायाम करत नाहीत. मात्र हे प्रॅक्टिस सेशन सर्वांसाठी अनिवार्य असणार आहेसलग 18 टेस्ट सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला न्यूझीलंडकडून सलग दोनदा पराभव स्वीकारावा लागलाअशावेळी आता टीमला शेवटचा सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही

मुंबई टेस्टसाठी टीम इंडियाची

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.

 

#garjahindustannews#garjahindustannews#garjahindustan#MaharashtraVidhanSabhaElection2024#MaharashtraVidhanSabha#ElectionResult2024#MaharashtraElectionResults2024

Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | GARJA HINDUSTAN | GARJA HINDUSTAN NEWS | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | GARJA HINDUSTAN NEWS LIVE | Mumbai local train update | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics

मागे

पोटाला चिमटा, कर्ज काढून रायफल, पण लेकाने पांग फेडले, पदकवीर स्वप्नील कुसाळेचे मायबाप भावूक
पोटाला चिमटा, कर्ज काढून रायफल, पण लेकाने पांग फेडले, पदकवीर स्वप्नील कुसाळेचे मायबाप भावूक

Swapnil Kusale : पोटाला चिमटा, कर्ज काढून रायफल, पण लेकाने पांग फेडले, पदकवीर स्वप्नील ....

अधिक वाचा