ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Ind vs Pak:'मौका मौका'ची ही नवी जाहिरात पाहिलीत का?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Ind vs Pak:'मौका मौका'ची ही नवी जाहिरात पाहिलीत का?

शहर : मुंबई

इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकातील भारत वि. पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना रविवारी खेळवला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच स्टार स्पोर्टसकडून 'मौका मौका' या सिरीजमधील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. विश्वचषकाच्या गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. हाच धागा पकडत 'मौका मौका' जाहिरातीमधून पाकिस्तानला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, आक्षेपार्ह संवांदांमुळे ही जाहिरात काहीशी वादग्रस्त ठरली होती. विशेष म्हणजे या जाहिरातीला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडूनही एक जाहिरात प्रसारित करण्यात आली. यामध्ये भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची खिल्ली उडवण्यात आली होती. त्यावरही नेटकऱ्यांनी सडकून टीका केली होती.या पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्टसकडून एक नवी जाहिरात प्रसारित करण्यात आलीय. या माध्यमातून अभिनंदन वर्धमान यांची खिल्ली उडवल्याचा पुरेपूर वचपा काढण्यात आला आहे

                                           

१६ जून रोजी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट आहे. याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदान झाकून ठेवण्यात आले आहे. परिणामी टीम इंडियाला सरावही करता आला नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये या लढतीविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

मागे

world cup 2019 : पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली
world cup 2019 : पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली

टीम इंडियाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 16 जूनला मॅच रंगणार आ....

अधिक वाचा

पुढे  

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी  सचिनचा कॅप्टन विराट कोहलीला सल्ला
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी सचिनचा कॅप्टन विराट कोहलीला सल्ला

न्यूझीलंड विरुद्धची मॅच रद्द झाल्यानंतर टीम इंडिया आपली पुढील मॅच 16 जून रोज....

Read more