ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अंपायरशी हुज्जत पडली महागात, ब्रेथवेटला सुनावली ही शिक्षा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 30, 2019 12:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अंपायरशी हुज्जत पडली महागात, ब्रेथवेटला सुनावली ही शिक्षा

शहर : मुंबई

वेस्ट इंडीजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेटच्या अडचणीत वाढल्या आहेत. भारताविरुद्धच्या मॅचमध्ये अंपायरशी हुज्जत घालणं त्याला महागात पडलं आहे. आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup 2019) मॅचमध्ये अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याने त्याच्या मॅच फीसच्या 15 टक्के इतका दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. ब्रेथवेट हा आयसीसी आचार संहिता कलम 2.8 च्या उल्लंघनात दोषी आढळला आहे. हा नियम आंतरराष्ट्री मॅच दरम्यान अंपायरच्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यासंदर्भातील आहे. ब्रेथवेटच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक डिमॅरिट पॉईंट जोडला गेलाय. सप्टेंबर 2016 मध्ये खेळाची संहिता आल्यानंतरचा त्याचा हा दुसरा गुन्हा आहे. ब्रेथवेटकडे आता 2 डिमॅरिट पॉईंट आहेत. 42 वी ओव्हर टाकत असताना अंपायरने दिलेल्या वाईड बॉलवर ब्रेथवेटने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेथवेटने आपला गुन्हा कबुल केला असून तो दंड देखील भरणार आहे. एमिरेट्स आयसीसी एलीट पॅनलचे मॅच रेफरी क्रिस ब्रॉड यांनी ब्रेथवेटला हा गुन्हा आणि दंड ठोठावला. त्यामुळे यासाठी अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही.

या सामन्यात भारताने गुरुवारी वेस्ट इंडींजचा 125 धावांनी पराभव केला. या विजयामुळे सेमी फायनलच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सुरुवातीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर वेस्ट इंडीजने पुढचे पाच सामने गमावले. त्यामुळे अफगाणिस्तान नंतर वर्ल्ड कप बाहेर जाणारी ही दुसरी टीम ठरली आहे.

मागे

बोरिस बेकरचा जगण्यासाठी संघर्ष, जिंकलेले करंडक विकण्याची वेळ
बोरिस बेकरचा जगण्यासाठी संघर्ष, जिंकलेले करंडक विकण्याची वेळ

कोर्टवर खेळताना तो कधीच डगमगला नाही, अनेक पराभव पदरी पडले पण अस्तित्व टिकवण....

अधिक वाचा

पुढे  

India vs England: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण पाकिस्तान टीम इंडियाच्या बाजूनं, शोएब अख्तरचा
India vs England: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण पाकिस्तान टीम इंडियाच्या बाजूनं, शोएब अख्तरचा

आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीची चुरस अधिक रंजक हो....

Read more