By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 24, 2020 04:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऑकलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघामध्ये होणार्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात झाली असून या मालिकेतील पहिला टी-२० सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे पार पडला. या सामन्यात टिम इंडियाने न्यूझीलंड संघाचा ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
प्रारंभी या कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडचे खेळाडू मार्टिन गप्टील आणि कोलीन मुनरो या दोघांनी ८० धावा काढल्या, मुनरोने ५९, कर्णधार विल्यमनने २६ चेंडूत ५१ धावा काढल्या, रॉस टेलरने २७ चेंडूत ५४ धावा ठोकल्या. त्यामुळे न्यूझीलंडने २० षटकात २०३ धावा काढल्या. न्यूझीलंडने भारताला २०४ रन्सच आव्हान दिले.
टीम इंडियाने २०४ धावांचं आव्हान ४ विकेट्सच्या मोबदल्यात १ ओव्हर राखून सामना जिंकत पार केले. के.एल.राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. भारताकडून के.एल राहुलने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावा ठोकल्या. कर्णधार विराट कोहलीने ३२ चेंडूत ४५ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने अंतिम षटकात धडाकेबाज अर्धशतक पूर्ण करीत या सामन्यात विजय मिळवला आहे. १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने उंच षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रेयसने २९ चेंडूत ५८ धावा ठोकल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीत अनेक प्राण्या....
अधिक वाचा