By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय टी-20 आयसीसी रँकिंगमध्ये एक पायरी खाली घसरत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर, पाकिस्तानचा संघ मात्र अव्वल स्थानी कायम आहे. आयसीसीने आज टी-20 चे रँकिंग प्रसिद्ध केले. पाकिस्तान क्रिकेट संघाकडे 286 गुण असून दक्षिण आफ्रिका, इंग्लंड. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे अनुक्रमे 262, 261, 261 आणि 260 गुण आहेत. रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिका दुसर्या, तर भारत पाचव्या स्थानी आहे.
सध्या रँकिंगमध्ये 80 संघ सहभागी आहेत. यात 2015-16 च्या मालिकेतील निकाल ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत. 2016-17 आणि 2017-18 च्या निकालांना 50 टक्के गुण दिले गेले आहेत. अफगाणिस्तान आणि श्रीलंका एक पायरी वर चढत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. वेस्ट इंडीज संघ नवव्या स्थानी आहे. नेपाळ चौदाव्या स्थानावरून 11 व्या स्थानी पोहोचला आहे. तर, नामीबियाचा संघ 20 व्या स्थानी आहे.
ऑस्ट्रिया, बोत्सवाना, लक्झेंबर्ग सारख्या संघांना पहिल्यांदाच या तालिकेत जागा मिळाली आहे. यात मे 2016 पासून इतर आयसीसी सदस्य देशांविरुद्ध 6 सामने खेळलेल्या सर्व सदस्य देशांना सहभागी करून घेण्यात आले आहे. महिला क्रिकेट संघ रँकिंगसाठी इतर संघांविरोधात गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये 6 सामने खेळणे अनिवार्य आहे.
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या ....
अधिक वाचा