By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2020 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020 Final) मोसमात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. यासह मुंबईने 5 व्यांदा विजेतपद पटकावलं. यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे . या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीत दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने नव्या जर्सीच अनावरण केलं आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या जर्सीबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आज बुधवारी (11 नोव्हेंबर) या जर्सीचं अनावरण केलं. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांच्या देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. या योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी विशेष जर्सीचं डिझाईन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्ध टी 20 मालिकेत ही स्पेशल जर्सी परिधान करणार आहे.
The Australian men's team will celebrate our First Nations people this summer by wearing this incredible Indigenous playing shirt for the entirety of the #AUSvIND Dettol T20 series!
मागे
IPL Final : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विजय
IPL 2020च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विज....
अधिक वाचा