By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 29, 2020 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (Australia vs india 2nd test)दुसऱ्या कसोटीत 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 70 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे.
टीम इंडिया विजयी आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. टीम इंडियाची सावध सुरुवात झाली. 16 धावांवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. मयंक अग्रवाल 5 धावांवर बाद झाला. अग्रवालमागे चेतेश्वर पुजाराही आऊट झाला. पुजाराने 3 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची 19-2 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने 51 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. यासह टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणेने नाबाद 27 तर शुभमन गिलने नाबाद 35 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना दुसऱ्या डावात 200 धावांवर रोखले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर सलामीवीर मॅथ्यू वेडने 40 धावा केल्या. तर पॅट कमिन्सने 22 धावांची झुंजार खेळी केली. टीम इंडियाने कांगारुंना सुरुवातीपासून झटके दिले. ऑस्ट्रेलियाने एकामागोमाग एक विकेट टाकले. यामुळे कांगारुंची 99-6 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर कॅमरॉन ग्रीन आणि पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर टीम इंडियाने कांगारुंना एकामागोमाग एक धक्के दिले. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जाडेजा, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर उमेश यादवने 1 बळी टिपला.
टीम इंडियाचा पहिला डाव
टीम इंडियाच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. मयंक अग्रवाल शून्यावर बाद झाला. मात्र यानंतर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. यानंतर गिल 45 धावांवर बाद झाला. गिल पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही 17 धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने हनुमा विहारी आणि रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. तर यानंतर रवींद्र जाडेजासह 121 धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे कांगारुंवर वरचढ ठरली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 191 धावा केल्या. या जोडीच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने 191 धावांचा टप्पा सहज पार केला. टीम इंडियाकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 112 धावांची शतकी खेळी केली. तर रवींद्र जाडेजाने 57 रन्स केल्या. टीम इंडियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 326 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला 131 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
कांगारुंचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या डावातह कांगारुंना हात खोलून दिले नाही. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फार वेळ मैदानात टिकता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशानेने 48 तर ट्रॅव्हिस हेडने 38 धावा केल्या. कांगारुंचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने 2 विकेट्स मिळवल्या. तर रवींद्र जाडेजाने 1 बळी टिपला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND, 2nd Test) यांच्यात मेलबर्नमध्ये दुसरा कसोट....
अधिक वाचा