ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत वि. बांगलादेश तिसरी टी-20, भारतीय संघात होऊ शकतो बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत वि. बांगलादेश तिसरी टी-20, भारतीय संघात होऊ शकतो बदल

शहर : मुंबई

राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये भारताची ओपनर जोडी शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करत बांगलादेशच्या टीमला पराभवाचा धक्का दिला. आज होण्याऱ्या तिसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दुसऱ्या सामन्यात रोहितने शानदार 85 रन तर धवनने 31 केले होते.

भारतीय टीम मॅनेजमेंट तिसऱ्या टी20 मध्ये तिसऱ्या स्थानावर केएल राहुलला खेळवू शकते. तर श्रेयस अय्यर चौख्या स्थानी खेळू शकतो. दुसऱ्या सामन्यात अय्यरने 13 बॉलमध्ये 24 रन केले होते. तर पाचव्या स्थानी विकेटकीपर ऋषभ पंत खेळू शकतो. ऋषभ पंत अजून काही चांगली कामगिरी करु शकत नसला तरी त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

बांगलादेशच्य़ा विरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये पंतच्या खराब विकेटकीपिंगचा परिणाम संघाला भोगावा लागला होता. पहिल्य़ा सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

मुंबईचा 26 वर्षाचा ऑलराउंडर शिवम दुबे हा देखील आपल्या डेब्यू सामन्यात काही खास कामगिरी करु शकला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याला बॅटींगची संधी नाही मिळाली. पण त्याच्य़ाकडून ही संघाच्या अपेक्षा आहेत.

क्रुणाल पंड्या ऑलराउंडरसह स्पिन बॉलिंगची जबाबदारी ही सांभाळणार आहे. त्य़ाच्या सोबतच युजवेंद्र चहल आणि वॉशिंगटन सुंदर यांच्याकडून ही चांगल्या कामगिरीची अपेक्षा संघाला आहे. फास्ट बॉलर दीपक चहर आणि शार्दुल ठाकुरला संधी मिळू शकते. खलील अहमदला आजच्या सामन्यातून बाहेर बसवलं जावू शकतं. खलील अहमद बांगलादेशच्या विरोधात काही खास कामगिरी करु शकला नाही.

भारतीय टीम: (शक्यता)

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकुर.

मागे

नाडाची पाच खेळाडूंवर चार वर्षांची बंदी
नाडाची पाच खेळाडूंवर चार वर्षांची बंदी

उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विज....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय महिला टीमने सातव्यांदा 3+ सामन्यांची मालिका जिंकली
भारतीय महिला टीमने सातव्यांदा 3+ सामन्यांची मालिका जिंकली

भारतीय महिला टीमने वेस्ट इंडीजला तिसऱ्या टी-२० सामन्यांत ७ गड्यांनी पराभूत....

Read more