ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इंग्लंड विरुद्ध 300 धावा फटकावणारा प्लेयर निघाला इंग्लंडला, 7 वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 24, 2024 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इंग्लंड विरुद्ध 300 धावा फटकावणारा प्लेयर निघाला इंग्लंडला, 7 वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर

शहर : मुंबई

टीम इंडियाचा हा प्लेयर इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक इनिंग खेळलाय. बऱ्याच काळापासून तो टीम इंडियात परतण्याचे प्रयत्न करतोय. पण त्यात त्याला यश आलेलं नाही. पण आता हा प्लेयर इंग्लंडच्या एका टीमकडून खेळणार आहे.

इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली असून ते टीम इंडिया विरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहेत. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये होईल. पण या सीरीजआधी टीम इंडियाचा एक क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये खेळणार हे निश्चित झालय.

एकवेळ हा खेळाडू टीम इंडियाचा भाग होता. इंगलंड विरुद्ध तो ऐतिहासिक इनिंग खेळला होता. एप्रिल-मे महिन्यात हा प्लेयर नॉथेम्पटनशायर काऊंटीसाठी खेळणार आहे. दोन महिन्यात नॉथेम्पटनशायरसाठी सात काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये तो खेळणार आहे.

याच काऊंटीने मागच्यावर्षी शेवटच्या तीन सामन्यांसाठी त्याला विकत घेतलं होतं. त्या तीन सामन्या त्याने 78, 150 आणि 21 धावा केल्या होत्या. तो पृथ्वी शॉ च्या जागेवर खेळणार आहे. त्यावेळी पृथ्वी आयपीएलमध्ये व्यस्त असले. इंग्लंडला निघालेल्या टीम इंडियाच्या या प्लेयरच नाव आहे, करुण नायर.

मागच्या सीजनमध्ये करुण नायरने ज्या तीन इनिंग खेळल्या, त्यात त्याने धावा केल्या. आपला शांत, संयमी स्वभावाने त्याने छाप उमटवली. नायरला पुन्हा टीममध्ये आल्याने आनंदी आहे, असं काऊंटीचे कोच जॉन सॅडलर यांनी म्हटलं आहे. करुण नायर टीम इंडियाकडून शेवटचा सामना 2017 मध्ये खेळला होता. भारताकडून तो सहा कसोटी आणि दोन वनडे सामने खेळलाय. मागच्या सात वर्षांपासून तो टीमच्या बाहेर आहे. आयपीएलमध्ये सुद्धा तो अपयशी ठरला. त्यामुळे आयपीएल 2024 च्या लिलावात त्याला कोणी विकत घेतलं नाही.

नायर भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा दुसरा फलंदाज आहे. नायर इंग्लंड विरुद्ध चेन्नईमध्ये ऐतिहासिक इनिंग खेळला होता. 2016 साली त्याने इंग्लंड विरुद्ध नाबाद 303 धावा केल्या होत्या.

 

मागे

IND vs ENG | टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धची कामगिरी, आकडे काय सांगतात?
IND vs ENG | टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धची कामगिरी, आकडे काय सांगतात?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्....

अधिक वाचा

पुढे  

विषप्रयोग झालेला क्रिकेटपटू कधीपर्यंत बोलू शकणार ? हेल्थ अपडेट काय ?
विषप्रयोग झालेला क्रिकेटपटू कधीपर्यंत बोलू शकणार ? हेल्थ अपडेट काय ?

सामना खेळून आल्यावर या क्रिकेटपटून विमानात पाणी समजून दुसरंच लिक्विड प्या....

Read more