ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर! चाहत्यानं भरमैदानात रोहित शर्माच्या अंगावरच मारली उडी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 06:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर! चाहत्यानं भरमैदानात रोहित शर्माच्या अंगावरच मारली उडी

शहर : मुंबई

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यात होत असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत आफ्रिकेला 275 धावांवर बाद केले. त्यामुळं भारताकडे आता 326 धावांची मोठी आघाडी आहे. मात्र या सामन्यात एक अजब प्रकार घडला.

तिसऱ्या दिवशी सामना सुरू असताना सामन्यादरम्यान एक चाहता मैदानात घुसला. त्यानं भारतीय खेळाडूंना भेटण्याच्या उत्साहात खेळाडूंवर उडी मारण्याचा प्रयत्न केला. यात रोहित शर्मा मैदानात पडलाही. सुदैवानं रोहितला कोणतीही जखम झाली नाही. मात्र लाईव्ह सामन्यादरम्यान मैदानात घुसण्याचा हा पहिला प्रकार नाही. याआधी टी-20 सामन्यादरम्यानही असाच प्रकार घडला होता.

पहिल्या कसोटी सामन्यातही असाच प्रकार घडला होता. या चाहत्यांना सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत मैदानात पळत सुटला आणि त्यानं रोहित शर्माचे पाय धरले. चाहत्याला अडवण्याच्या नादात रोहित शर्मा खाली पडला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी या चाहत्याला बाहेर काढले.

या सगळ्या प्रकारानंतर दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर यांनी समालोचन करत असताना टीम इंडियाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी गार्ड आणि सुरक्षा व्यवस्थेची शाळा घेतली. गावस्कर यांनी, “असे प्रसंग आधी घडायचे कारण त्यावेळी सुरक्षा नसायची मात्र आता असे प्रकार घडतात हे निंदनीय आहे. अशा प्रकारांना वेळीच आळा घातला पाहिजे. सुरक्षा रक्षकांनी प्रेक्षकांकडेही लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले.

याआधी तीन वेळा घडला असाच प्रकार

या मालिकेत तिसऱ्यांदा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. याआधी कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी काढण्यासाठी एक चाहता मैदानात घुसला होता. दरम्यान त्याआधीही असाच प्रकार घडला होता. अशा प्रकारांमुळं टीम इंडियाच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वांसमोर आला आहे.

मागे

पंचांच्या चुकीमुळे मेरी कोमचं 'सुवर्ण'स्वप्न भंगलं,
पंचांच्या चुकीमुळे मेरी कोमचं 'सुवर्ण'स्वप्न भंगलं,

भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमला सातव्यांदा जागतिक अजिंक्यपद बॉक्सि....

अधिक वाचा

पुढे  

बीसीसीआयच्या निवडणुकीमध्येही भाजपचा झेंडा
बीसीसीआयच्या निवडणुकीमध्येही भाजपचा झेंडा

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीचं बीसीसीआयचा अध्यक्ष बनणं निश्चित झ....

Read more